आरोग्य शिबिर थांबवल्यामुळे हजारो रुग्ण उपचारापासून वंचित - महिला आघाडी जिल्हाध्यक्षा शितल भांगे - nanded24news.com/बातमी मागची बातमी

Breaking

nanded24news.com/बातमी मागची बातमी

बातमी मागची बातमी

test banner

Post Top Ad

Post Top Ad

Saturday, February 24, 2024

आरोग्य शिबिर थांबवल्यामुळे हजारो रुग्ण उपचारापासून वंचित - महिला आघाडी जिल्हाध्यक्षा शितल भांगे

हिमायतनगर - मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन वाळकेवाडी तालुका हिमायतनगर येथे शासन आपल्या आपल्या दारी योजने अंतर्गत मुख्यमंत्री जनकल्याण कक्षा कडून आरोग्य शिबिर व विविध शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता परंतु राजकारण करत हा मेळावा बोटावर मोजण्या इतक्या स्थानिक च्या पुढार्‍यांनी थांबवल्याने आरोग्य शिबिरातील उपचारापासून हजारो रुग्ण वंचित राहिले आहेत, यामुळे गोरगरीब आजारी १० हजार रुग्णांना फायदा झाला असता असे मत शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शितलताई भांगे पाटील यांनी व्यक्त केले.


त्या वाळकेवाडी येथे नियोजित आरोग्य शिबिर राजकारण करत थांबवल्याप्रकरणी सदर मुद्द्यावर बोलत होत्या पुढे बोलतांना भांगे पाटील म्हणाल्या, हदगाव तालुक्यामध्ये मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांचे कडून शासन आपल्या दारी च्या माध्यमातून अनेक ठिकाणी आरोग्य शिबिर आयोजित केले होते या शिबिरात गोरगरीब गरजवंत रुग्णांना उपचार मिळवून अनेक जण व्याधीमुक्त झाले अनेकांवर शहरातील मोठ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


 याच पद्धतीने वाळकेवाडी येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, शिबिरात हजारो रुग्ण उपचार घेतील त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे, खासदार हेमंत पाटील यांचे नाव जनसामान्य माणसापर्यंत पोहोचेल याचा बाऊ करत, आमच्या समाजावर खासदार साहेबांनी अन्याय केला असे म्हणत काही मोजक्या तरुणांनी शिबिर करण्यास मज्जाव केला, याच ठिकाणी धार्मिक कार्यक्रम असल्याने कुठेही गालबोट लागू नये म्हणून स्थानिक चे पुढारी असलेले तटस्थ सरपंच प्रतिनिधी व उपसरपंचाच्या म्हणण्यानुसार सदर कार्यक्रम रद्द करण्यात आला परंतु यामुळे हजारो रुग्णांच्या आशेवर उपचारावर पाणी फिरले त्याचं काय? असाही सवाल त्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे.

No comments:

Post Top Ad

test banner